महाराष्ट्र

भिगवण प्रकरणात मोठी घडामोड: तरुण-तरुणी पोलिसात हजर; अपहरण नसून प्रेमप्रकरणाचा दावा

भिगवण: गेल्या दोन दिवसांपासून भिगवण बाजारपेठेतून तरुणीचे अपहरण झाल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाला आता मोठा ट्विस्ट मिळाला असून संबंधित तरुणी आणि अपहरणाचा आरोप असलेला तरुण दोघेही पोलिसांत हजर झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ५० तासांनंतर दोघेही रात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. तरुणीने यापूर्वी व्हिडिओद्वारे मांडलेली भूमिका कायम ठेवत, “माझे अपहरण झालेले नाही. आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत गेले,” असे पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी चारच्या सुमारास भिगवण बाजारपेठ परिसरातून तरुणी आई आणि भावासोबत आली असताना तिचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले. आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय रंगही घेतला होता.

लग्न ठरल्याने घरातून पळाल्याचा दावा

तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या प्रेमसंबंधाची माहिती घरी होती; मात्र कुटुंबीयांनी दुसरीकडे लग्न ठरविल्याने ती संबंधित तरुणासोबत निघून गेली. त्यामुळे अपहरणाचा प्रश्नच येत नसल्याचे ती ठामपणे सांगत आहे.

सध्या पोलिसांकडून दोघांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या घडामोडीनंतर भिगवण परिसरातील तणाव काहीसा निवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

16 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

19 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

19 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago