आरोग्य

एनीमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

एनिमिया म्हणजे काय

ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBC (Red Blood Cell) ची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या

कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो.

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील उतींपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे कार्य करत असतो. मात्र कोणत्याही

कारणाने RBC ची संख्या कमी झाल्यास किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते तेंव्हा शरीरातील विविध अवयवांच्या उतींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही.

अयोग्य आहार यामुळे आपल्याकडे अनेक लोक ऍनिमियाने त्रस्त आहेत. विशेषतः सर्व वयोगटातील महिलांमध्ये ऍनिमियाचे प्रमाण चिंताजनक आहे.

ऍनिमियाचे प्रकार

अनीमियाचे अनेक प्रकार असून ते अनेकविध कारणांनी होतात. जसे…

1) Iron deficiency अनेमीया

रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया.

2) Pernicious Anemia विटामिन B12 च्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया.

3) Megaloblastic Anemia

फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया.

4) Sickle cell diseases, Thalassemia

जेनेटिक कारणांमुळे या प्रकारचा एनीमिया होतो

अनिमिया आजाराची कारणे

रक्तस्त्राव झाल्याने अनीमिया उद्भवू शकतो. प्रामुख्याने अपघात, शस्त्रक्रिया, विविध कैन्सर, अल्सर, मुळव्याध, मासिक पाळी यांमुळे होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे अनीमिया उद्भवतो.

विविध विकारांमध्ये एनीमिया हे लक्षण आढळते. जसे किडनी फेल्युअर, आमवात, संक्रामक TB, विविध कैन्सर, हायपोथायरॉडिजम, रोगप्रतिकारक क्षमतेचे विकारांमध्ये रक्ताल्पता अनीमिया हे लक्षण आढळते. भोजनातील लोह, विटामिन B12, फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे,

योग्य वयापुर्वीच गर्भावस्था येणाऱ्या स्त्रियांमध्ये, मासिकस्त्रावावेळी अधिक रक्त स्त्राव झाल्याने महिलांमध्ये, आतड्यातील कृमींमुळे.

एनीमियाची लक्षणे

रक्तस्त्रावयुक्त मुळव्याधीच्या विकारांनी पिडीत रुग्णांमध्ये अरक्तता उत्पन्न होते. शरीर पांढरे पडणे, त्वचा पांढरी, निस्तेज होणे,

चक्कर येणे, शारीरीक दुर्बलता, थकवा जाणवणे, छातीत धडधडणे,

भूक मंदावणे, चेहरा, पाय, शरीरावर सुज आलेली आढळते,

अल्प परिश्रमानेसुद्धा धाप लागणे.

त्वचा, नखे निस्तेज रुक्ष होतात, नखे सहज तुटु लागतात, नखे चपटी होतात.

एनिमिया होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी

पोषकतत्वयुक्त संतुलित आहार घ्यावा. विशेषत लोह, फॉलिक एसिड, जीवनसत्व ब12 ह्या

पोषकतत्वांनी युक्त आहार घ्यावा.

मद्यपान, धुम्रपान इ. व्यसनांपासून दूर राहावे. गर्भावस्थेमध्ये एनीमिया उत्पन्न होऊ नये यासाठी डॉक्टरांनी दिलेली लोह आणि फॉलिक एसिडची औषधे वेळच्यावेळी घ्यावीत.

मासिक पाळीमध्ये अधिक स्त्राव येत असल्यास स्त्रीरोग तज्ञांद्वारा उपचार करुन घ्यावेत.

अधिक काळापर्यंत अनीमियाची स्थिती राहिल्यास, शारीरीक दुर्बलता निर्माण होते, कार्य करण्याची क्षमता कमी होते, हृदयावर अनिष्ट परिणाम होतात. त्यामुळे यावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. एनीमियामध्ये शारीरीक दुर्बलता कमी करण्यासाठी उपचार योजले जातात. पूरक औषधे, व्हिटॅमिन दिले जाते. रक्त कमी असल्यास रुग्णास रक्त चढवले जाते, ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

काहीवेळा व्हिटॅमिन बी 12 च्या आवश्यकता असते. रक्तस्त्राव झाल्यास किंवा हिमोग्लोबिनची पातळी खूप कमी असल्यास, रक्त चढवण्याची आवश्यकता भासू शकते.

परंतु बर्‍याच वेळा एवढे करूनही रक्ताची/हीमोग्लोबिन ची पातळी वाढत नाही. आहारातील लोह, व्हिटॅमिन बी 12 आणि फोलेटची कमतरता झाल्यामुळे एनीमियाची स्थिती निर्माण झालेली असल्यास पौष्टिक पूरक आहार घेतला पाहिजे. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात पालक, लाल माठ यासारख्या हिरव्या भाज्या समाविष्ट कराव्यात. तसेच काळ्या मनुका, खजूर, आंबा, पेरू, बीट, सफरचंद यामध्ये मुबलक प्रमाणात लोह असल्याने ही फळे जरूर खावीत. याशिवाय दूध व दुधाचे पदार्थ, नारळ, शेंगदाणे, तीळ, गुळ, मसूर डाळ, मोड आलेली कडधान्ये, सुखामेवा, अंडी, मांस, मासे, चिकन यांचाही आहारात समावेश असावा. यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

7 तास ago

हाता-पायांना सतत घाम का येतो,कारणे काय? वेळीच करा उपाय

पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला…

7 तास ago

गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…

7 तास ago

पूर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण नको; दोषींवर कठोर कारवाई करा; एकनाथ शिंदे

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना…

7 तास ago

विधान परिषद निकालाने भाजपला जनतेचा इशारा; महायुतीच्या परतीचे दिवस सुरु;  विजय वडेट्टीवार

‘संघभूमीतही भाजपचा प्रभाव दिसला नाही’; ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरले, १ नोव्हेंबरच्या दिल्ली आंदोलनाची घोषणा नागपूर:…

7 तास ago

‘भ्रष्टाचाराच्या मलईसाठी गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला’; हर्षवर्धन सपकाळ

कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन…

7 तास ago