अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन महिना उलटला असला तरी काही ठिकाणी सत्तासमीकरणांची जुळवाजुळव अद्याप सुरू आहे. अमरावती महानगरपालिकेत तर स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे.
काँग्रेसचे बळ वाढले, वंचितचा पाठिंबा
निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसप्रणीत आघाडीचे संख्याबळ १५ वरून १६ वर पोहोचले आहे. वाढलेल्या संख्याबळामुळे काँग्रेसला आता गणितानुसार दोन स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी ही संधी केवळ एका सदस्यापुरती मर्यादित होती. त्यामुळे स्थायी समितीवरील प्रभाव वाढवण्यात काँग्रेसला मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.
ठाकरे गटाचे ‘शिवसेना-बसपा’ आघाडीत विलीनीकरण
दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) गटातील दोन सदस्यांनी ‘शिवसेना-बसपा’ आघाडीत विलीनीकरण केले आहे. या घडामोडीनंतर संयुक्त गटाची सदस्यसंख्या ८ झाली आहे. मात्र, तांत्रिक गुणांकनानुसार या गटाला केवळ एकच स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहे.या विलीनीकरणासाठी राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून एकमेकांविरोधात भूमिका घेणाऱ्या गटांमध्ये नव्या समीकरणांची जुळवाजुळव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समिती निवड अधिक रंजक
या सर्व राजकीय घडामोडींमुळे अमरावती महापालिकेतील स्थायी समिती सभापती आणि स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग अधिकच रंजक बनला आहे. वाढते संख्याबळ, बदलती आघाडी आणि अंतर्गत राजकीय हालचाली यामुळे आगामी निर्णयांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील या नव्या सत्तासमीकरणांमुळे पुढील काही दिवसांत आणखी राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…