शिंदे-फडणवीस सरकारला मोठे यश…
औरंगाबाद: महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यास केंद्राची अनुमती असल्याचे म्हटले होते.
तसेच, आता औरंगाबाद शहराचेही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे मोठे यश म्हणावे लागेल..
केंद्र सरकारच्या या निर्णयाची प्रत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. तसेच,’औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले, असेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…