महाराष्ट्र

गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात!

घटना अतिशय दुर्दैवी, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचा खुलासा…

कोल्हापूर: श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे.

कणेरी मठाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हजारो गाईंचा सांभाळ केला जातो, त्यासाठी गोशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. भाकड व भटक्या गाईना कोणी वाली नाही अशा जनावरांनाहि कणेरी मठ येथील गोशाळेत आणून त्यांचे पालन पोषण केले जाते. त्यामुळे ही गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसेच लम्पीच्या साथीमध्ये हजारो जनावरांना मोफत औषधे देऊन त्यांचे प्राण मठाने वाचवले आहेत. भटक्या कुत्र्यांच्यासाठी ही नुकतीच निवारा व सेवा शाळा सुरु करण्यात आलेली आहे.

पर्यावरण रक्षणाबरोबरच जनावारावरील निष्टा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात आहे. यातूनच देशभरतील दुर्मिळ होत असलेल्या देशी प्रजातीच्या गाई, बैल, शेळी, अश्व, गाढव, मांजर यांचे प्रदर्शन आणि स्पर्धाहि घेतल्या जात आहेत. देशी प्रजाती टिकाव्यात हाच या महोत्सवाचा हेतू आहे.

अशा वेळी काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू मठाच्या दृष्टीने अतिशय वेदनादायीच आहे. कुणाच्या तरी अज्ञानांतून ही गोष्ट घडलेली आहे. ती नेमकी कशी घडली याबाबत वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लवकरच बाहेर येईलच. कृपया झालेल्या घटनेबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये इतकीच विनंती आहे.

मठाने नेहमी पत्रकार बांधवांचा सन्मान केला आहे, तसेच पत्रकार बांधवांनी हि नेहमी मठाच्या विविध सामाजिक उपक्रमात आपले बहुमुल्य योगदान दिले आहे व नेहमीच अमुल्य सहकार्य केलेले आहे व करत आहेत. तरी आज कोणी खोडसाळपणे पत्रकार बांधवांच्या बाबतीत गैरप्रकार केला त्याबद्दल आम्ही व्यवस्थापनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहोत.

उत्सव समिती

श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंथन मठ,

कणेरी, कोल्हापूर 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

3 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

3 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

7 तास ago