मुंबई: महाराष्ट्रासह इतर काही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लागणारा ५० टक्क्यांचा कोरम पूर्ण झाला आहे. त्यामुळे लवकर भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा भाजपाला पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नितीन गडकरी यांनी नुकताच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद तसेच स्वत:च्या निवृत्तीबाबतही त्यांनी भाष्य केलं. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत विचारलं असता, मला पदाचा मोह नाही. मी सध्या जे काम करतो आहे. त्यात मी समाधानी आहे. माझी महत्त्वाकांक्षा सत्तेपेक्षा विकासावर केंद्रित आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच पक्षाला पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे का, असं विचारलं असता, “या बाबतीत पक्षाचे नेते निर्णय घेतील.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतही भाष्य केलं. सध्या माझा निवृत्त होण्याचा कोणताही विचार नाही. मी जोपर्यंत फीट आहे, तो पर्यंत काम करणार आहे. गेल्या ६० वर्षात जे काम झालं नाही, ते आम्ही १५ वर्षात करून दाखवलं आहे. त्यामुळे सध्यातरी थांबायचा विचार नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच मी दीर्घकालीन योजना बनवत नाही. मी थोडासा अव्यवस्थित आणि अनुशासनहीन आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी नितीन गडकरी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, “मी दररोज सकाळी माझ्या नातवाशी बोलतो. आम्ही एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेतो. आम्ही स्पेनला सहलीला गेलो होतो.” साधे जीवन जगण्याचा आपला दृष्टिकोन आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…