मुंबई: पोलीस दलातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक दीपक नीलकंठराव अंकुरकर याने बालपणीच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलेचा पतीही पोलीस दलातच असून, तो आरोपीचा जवळचा मित्र आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी रोजी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघविला रिसॉर्टमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. पिडीतेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरुद्ध सबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले होते
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती आणि आरोपी दीपक अंकुरकर यांची मैत्री २००९-१० पासून खूप घट्ट होती. दोघेही गडचिरोली पोलीस दलात शिपाई म्हणून एकत्र कार्यरत होते. २०१७ साली दीपकने विभागीय परीक्षेत यश मिळवून उपनिरीक्षक पद मिळवले. जानेवारी २०२५ मध्ये दीपकने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून कुटुंबांसमवेत गोव्याला सहलीला जाण्याचे नियोजन केले होते, ज्यात पीडित महिला आणि तिचे कुटुंबही सहभागी झाले होते. याच सहलीदरम्यान दीपकने महिलेसोबत असभ्य वर्तन करायला सुरुवात केली.
१५ फेब्रुवारी २०२५ रोजी दीपक आणि त्याचे काही मित्र त्यांच्या कुटुंबांसह नागपूरजवळील वाघविला रिसॉर्टमध्ये गेले होते. त्यावेळी पीडित महिला एका खोलीत एकटी असताना, आरोपी दीपक त्या खोलीत शिरला आणि त्याने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला, असा गंभीर आरोप आहे. या घटनेनंतरही तो महिलेला वारंवार शरीरसुखाची मागणी करत धमकी देत होता, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, ३३ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपी दीपक अंकुरकरविरोधात बलात्कार, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने हिंमत करून घडलेली आपबिती आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून कोंढाळी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात औपचारिक तक्रार नोंदवली. पोलीस सध्या आरोपीचा कसून शोध घेत आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, एकच खळबळ उडाली आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…