महाराष्ट्र

आसाममध्ये भाजपची ‘हिस्टोरिक व्हिक्टरी; हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक

गुवाहाटी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व सरमा यांचे विशेष अभिनंदन केले. हिमंता बिस्व सरमा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित राहण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.

आसाममध्ये भाजपने १०२ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “आसामच्या जनतेने विकासावर विश्वास ठेवत भाजपला भरघोस समर्थन दिले. हिमंता बिस्व सरमा हे डायनामिक आणि व्हिजनरी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि जनकल्याणाच्या योजनांनी मोठे यश मिळवले.”

‘अरुणोदय’ आणि ‘लाडकी बहिणी’सारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. “हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे,” असेही ते म्हणाले.

यावेळी शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’चा विचार देशासमोर ठेवला. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी केला असून, देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचे कौतुक करत शिंदे म्हणाले, “अमित शाह यांची चाणक्यनीती पश्चिम बंगालप्रमाणेच आसाममध्येही यशस्वी ठरली. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले.”

भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना शिंदे म्हणाले, “कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन मेहनत घेतली आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. हा विजय त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे.”

महाराष्ट्र आणि आसाममधील संबंधांचा उल्लेख करत त्यांनी जुनी आठवणही सांगितली. “चार वर्षांपूर्वी आम्ही याच रेडिसन हॉटेलमध्ये होतो. त्यावेळी आसाम सरकारने आम्हाला मोठी मदत केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले,” असे शिंदे म्हणाले.

“आई कामाख्या देवीचा आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी आहे. डबल इंजिन सरकारमुळे आसाममध्ये विकास, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विकास अधिक वेगाने होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

9 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

10 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

10 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

11 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

11 तास ago