महाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये ‘ब्लॅकआऊट’चा सराव! कुठे व केव्हा होणार? जाणून घ्या…

संभाजीनगर: सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी (११ मे) ब्लॅकआउट मॉक ड्रील होणार आहे. हा एक सराव असून घाबरण्याचं काहीही कारण नाही. नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.

क्षेत्रनिहाय ब्लॅकआऊट वेळापत्रक

१) सायं. ७:३० ते ७:५० वाजेपर्यंत

विद्यानगर, विशाल नगर, न्यू हनुमाननगर, न्यू गणेशनगर, राममंदिर परिसर, मातोश्री नगर, तिरुमला सोसायटी, हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर, हनुमाननगर, गणेशनगर

विद्युत भार: २२ मे.वॅट | ग्राहक: १६,९५३

२) रात्री ८:०० ते ८:२० वाजेपर्यंत

हर्सूल, जटवाडा रोड, भगतसिंग नगर, चेतनानगर, जहांगिर कॉलनी, अंबर हिल, हरी ओमनगर, एकतानगर

विद्युत भार: १० मे.वॅट | ग्राहक: १८,००0

३) रात्री ९:०० ते ९:२० वाजेपर्यंत

सातारा, नक्षत्रवाडी, गोलवाडी, कांचनवाडी, बीड बायपास रोड, देवळाई गाव परिसर, एमआयटी कॉलेज

विद्युत भार: २५ मे.वॅट | ग्राहक: २५,०००

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

सायरन वाजल्यानंतर इन्व्हर्टर/जनरेटर बंद करा.

खिडक्यांचे पडदे लावून घरात अंधार करा.

रस्त्यावर असल्यास वाहन बंद करून बाजूला थांबा.

मोबाईलचा वापर टाळा, एकमेकांना हाक मारू नका.

वयोवृद्ध, लहान मुले व आजारी लोकांची काळजी घ्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

14 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago