उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते, म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.
उपाय
नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहील.
उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढू देऊ नका.
माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
प्रत्येक काम सावकाशच करा.
जेवतेवेळी मधे मधे एक दोन वेळा थोडे पाणी प्यावे.
ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…