मुंबई: ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खरेदी करण्यात आलेल्या सन 2023 मधील ग्रंथांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधीच्या “ग्रंथभेट” योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी राज्य ग्रंथालय नियोजन समितीने मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून निवड प्रक्रिया पार पडली आहे. राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीमार्फत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील निवडक ग्रंथांची खरेदी करण्यात आली आहे.ही खरेदी शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे येथे करण्यात आली असून या ग्रंथांचे वितरण सुरू झाले आहे.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ९४० शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये तसेच ६० मध्यवर्ती कारागृह ग्रंथालये अशा एकूण १ हजार लाभार्थी ग्रंथालयांना ग्रंथांचा लाभ देण्यात येणार आहे. ग्रंथपार्सल वितरणाचे काम टपाल खात्यामार्फत शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे येथून सुरू करण्यात आले आहे.सदर ग्रंथांचा जास्तीत जास्त वाचकांना लाभ मिळावा यासाठी संबंधित ग्रंथालयांनी हे ग्रंथ ग्रंथ प्रदर्शनी विभागात ठेवावेत, अशा सूचना ग्रंथालय संचालनालयामार्फत देण्यात आल्या आहेत.असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…