महाराष्ट्र

३०० कोटी कर्ज मंजूर करण्यासाठी ६४ कोटींची लाच घेतली

मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचं कर्ज मंजूर करण्यासाठी चंदा कोचर यांनी ६४ कोटींची लाच स्वीकारल्याचा आरोप होता.

अपीलीय न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे. व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचं कर्ज दिल्यानंतर त्या बदल्यात ६४ कोटींची रक्कम चंदा कोचर यांच्या पतीच्या कंपनीला देण्यात आली होती.

ट्रिब्यूनलनं सुनावणीनंतर निकाल देताना स्पष्ट केलं की लाचेची देवघेव ही स्पष्ट होती. आय़सीआयसीआय बँकेनं २७ ऑगस्ट २००९ रोजी व्हिडीओकॉनला ३०० कोटींचं कर्ज दिलं. पुढच्याच दिवशी व्हिडीओकॉनची कंपनी एसपीएलने दीपक कोचर यांची कंपनी न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटी पाठवले. ट्रिब्यूनलने हा क्विड प्रो क्वो असल्याचं सांगितलं. कर्जाच्या बदल्यात लाच देण्याचा हा प्रकार आहे.

चंदा कोचर यांच्यावर बँकेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. कर्ज मंजूर करताना त्यांनी पतीचे व्हिडीकॉन कंपनीशी व्यावसायिक संबंध आहेत हे सांगितलं नाही. हितसंबंधाच्या नियमांचं हे उल्लंघन होतं. चंदा कोचर यांना त्यांच्या पतीच्या कामाची माहिती नव्हती असं सांगू शकत नाहीत असंही न्यायालयाने म्हटलं.

ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या पतीची ७८ कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ही कारवाई योग्य असल्याचंही ट्रिब्यूनलने म्हटलं. यात मुंबईत चर्चगेटजवळ असलेल्या त्यांच्या फ्लॅटचा समावेश आहे. मात्र १०.५ लाखांची रोकड परत देण्यात आली. कोचर दाम्पत्याने या रकमेबाबत पुरावे दिले होते.

सध्या चंदा कोचर आणि दीपक कोचर हे जामीनावर बाहेर आहेत. पण त्यांच्यावर खटला सुरू आहे. कोचर यांनी फसवणूक केल्याचं आणि बँकेला नुकसान पोहोचवल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. व्हिडीओकॉनला दिलेलं कर्ज नंतर बुडालं आणि यामुळे आयसीआयसीआयला मोठा फटका बसला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

37 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago