महाराष्ट्र

पुण्यात त्या भाजप नेत्यावर नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई: हनी ट्रॅप प्रकरणामुळे भाजप नेते प्रफुल्ल लोढा हे चर्चेत आहेत. आता त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुण्यात लोढा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. लोढा यांच्यावर आधीच दोन मुलींवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

राजकारणात सक्रीय असलेल्या प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप ३६ वर्षीय महिलेनं केलाय. लोढा यांनी महिलेला बालेवाडीत एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावून घेतलं आणि बलात्कार केला असा आरोप आहे.

पीडितेनं विरोध करताच महिलेची नोकरी घालवण्याची धमकी प्रफुल्ल लोढा यांनी दिली. त्यानंतर बळजबरीने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

महिलेनं तक्रारीत म्हटलं की, प्रफुल्ल लोढा यांनी नवऱ्याला नोकरी लावून देतो असं सांगितलं. त्या बहाण्यानं २७ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावलं. तिथं प्रफुल्ल लोढा यांनी तुझ्या नवऱ्याला नोकरी लावायची असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव असं म्हटलं. मी यासाठी नकार दिला. मी विरोध करताच लोढा यांनी तुझीही नोकरी घालवेन असं म्हणत धमकी दिली आणि माझ्या इच्छेविरुद्ध बळजबरी शरीरसंबंध ठेवले.

महिलेनं प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात तक्रार दिल्यानं आता लोढा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याआधीही त्यांच्यावर दोन मुलींवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. त्यातच नव्या गुन्ह्यामुळे प्रफुल्ल लोढा यांचा पाय आणखी खोलात गेलाय.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

13 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

22 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago