परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या
मुंबई: मोटार परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.
परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या (IMV) ऑन लाईन बदल्या करण्यात आल्या.व संदर्भात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, ऑनलाइन बदल्या करतांना अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाऊन घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावे. भविष्यात अधिकाऱ्यांना ३ ऐवजी ५ पसंती क्रम दिल्यास ऑन लाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मिळण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून ऑन लाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी. असे ते म्हणाले.तसेच यावेळी गतवर्षी राबविलेल्या ऑन लाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…