आरोग्य

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय प्रत्येकाला माहित असायला हवे जेणेकरून आपण आपल्या घरी आहाराच्या माध्यमातून हिमोग्लोबिन सामान्य स्थितीत ठेवू शकतो. हिमोग्लोबिन वाढविणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवणे होय.

हिमोग्लोबिन वाढवण्याचे घरगुती उपाय 

हिमोग्लोबिन वाढवण्याचे घरगुती उपाय म्हणजे आपला आहार समतोल करणे. आपल्या आहारात लोहयुक्त पदार्थाचे प्रमाण वाढवणे.

लोहयुक्त पदार्थ कोणकोणते आहेत त्याची यादी खालीलप्रमाणे

पालक: पालक भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण जास्त असते. नियमित पालकाची भाजी खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढू शकते. 100 ग्राम पालकच्या भाजीमध्ये अंदाजे ४ मिलिग्रॅम इतकं लोह मिळते.

पीनट बटर: शेंगदाणे पासून तयार केलेलं पीनट बटर लोह मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. आपल्या दररोजच्या ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड आणि पीनट बटर घेऊ शकता. १०० ग्राम पीनट बटर मधून तुम्हाला १.९ मिलिग्रॅम लोह मिळू शकते.

बीट: बीटमध्ये फोलेटचे प्रमाण सर्वात जास्त असते. फोलेट हा एक प्रकारचा व्हिटॅमिन बी आहे. फोलेट हिमोग्लोबिन वाढीसाठी आवश्यक भूमिका बजावतो. शरीर हेम तयार करण्यासाठी फॉलेटचा वापर करते. रक्तवाढीसाठी डॉक्टर नेहमी आपल्या आहारात बीट खाण्याचा सल्ला देतात.

बीट मध्ये लोह, मॅग्नेशियम , तांब, फॉस्फरस त्याचबरोबर व्हिटॅमिन B -1, B -2, B -6, B -12 व्हिटॅमिन C सह समृद्ध घटक मिळतात. १०० ग्राम बीटमधून ०.८ मिलिग्रॅम लोह मिळू शकते. बीटरूट आपण कोशिंबीर, कच्चे सेवन किंवा शिवलेल्या जेवणामधून घेऊ शकतो.

बीटरूट तुम्ही ज्युस स्वरूपात देखील घेऊ शकता. हिमोग्लोबिनची वाढण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत आपल्याला माहित असायला हवे. यामुळे

तीळ: काळे तिळामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांब, जस्त, सेलेनियम आणि व्हिटॅमिन बी- ६ तसेच फॉलेटचे प्रमाण जास्त असल्याने लोह वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे. तीळ रात्री पाण्यात भिजवून सकाळी मधासोबत सेवन केल्याने फायदा होऊ शकतो. तिळाचे लाडू सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा तिळाचा उपयोग जेवणामध्ये रोटी, पराठा यामध्येदेखील करू शकता.

हिरव्या पालेभाज्या: पालक, मोहरीच्या हिरव्या भाज्या, ब्राकोली यासारख्या हिरव्या भाज्या लोहाचे शाकाहारी स्रोत आहेत. ब्राकोली भाजी लोह आणि बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, फॉलिक ऍसिडचा समृद्ध स्रोत आहे. ब्रॅकोलीमध्ये आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो.हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात शिवाय फायबरचे चांगले घटक असतात त्यामुळे पचन सुधारण्यात मदत होते.

मोरिंगा पाने: मोरिंगाच्या पानामध्ये झिंक, लोह, तांब, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन- ए बी सी असतात. मोरिंगाची काही बारीक पाने घेऊन त्याची पेस्ट बनवून त्यात एक चमचा गूळ घालून दररोज त्याचे सेवन करा.

फळे खा: सफरचंद, द्राक्षे, केळी, डाळिंब, टरबूज हिमोग्लोबिनची संख्या सुधारण्यात मदत करतात. फळामध्ये लोह वाढवण्यासाठी उत्तम फळ म्हणजे सफरचंद आहे. तुम्ही फळांचे जूस किंवा सलाड तसेच नेहमीच्या पद्धतीने घेऊ शकता.

टोमॅटो: टोमॅटोमधून व्हिटॅमिन सी आणि लोह या दोन्ही गोष्टी मिळतात. टोमॅटो हे शरीरातील लोह वाढवण्याचे उत्तम मार्ग आहे. आपण आपल्या दैनंदिन आहारात टोमॅटोचा वापर करायला हवा. १०० टोमॅटोमधून ०.८ मिलिग्रॅम लोह मिळू शकते.

डाळिंब: डाळिंबामध्ये लोहाबरोबरच कॅल्शियम, फायबर, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स असतात. अशक्तपणामध्ये असल्यास डाळिंब फायदेशीर ठरू शकते. १०० डाळिंब मधून ०.३ लोह मिळू शकते.

समुद्रातील / नदीतील मासे: सी – फूड उत्तम प्रकारचे प्रोटिन्स, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते.

मध: मध शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. मधामुळे असलेल्या पोषक तत्वामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. १०० ग्राम मधामधून ०.४ ग्राम लोह मिळू शकते.

सुका मेवा: सुकामेवामध्ये अंजीर, जर्दाळू, बदाम, काळ्या मनुका, खारीक, अक्रोड, अनेक ड्रायफुट्स यांचा समावेश होतो. सुकामेवामध्ये उच्चं प्रतीचं प्रोटीन आणि लोह मिळू शकते. खजूर आणि मनुका लोह आणि व्हिटॅमिन यांचे मिश्रण देतात. अंजीर लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि फॉलेटच्या गुणधर्माने परिपूर्ण असतात.

सकाळी मूठभर वाळलेलं अंजीर आणि मनुका तसेच दोन तीन खजूर खाल्ल्याने तुम्हाला झटपट ऊर्जा मिळू शकते. हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी आठवड्यातून दोनदा अंजीरचे दूध झोपेच्या वेळी शिफारस केली जाते.

अंडी: अंड्यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. अंड्यामध्ये लोहाचे प्रमाण असते. एका अंड्यातून १.५९ मिलिग्रॅम लोह मिळू शकते.

आवळा: आवळा ज्याला इंडियन गूसबेरी असेही म्हटले जाते.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह पुरेशा प्रमाणात असतात. दररोज आवळा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदा होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

16 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 दिवस ago