महाराष्ट्र

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या घटनेने रुई पुलावर एकच खळबळ उडाली असून, पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पवन अशोक शेंडे (वय ३२, रा. हेगडे गल्ली, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे नदीत उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पवन इचलकरंजी येथे हातमाग कामगार म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पवनचा घरात वाद झाला. त्यानंतर तो रागाच्या भरात मोटारसायकल घेऊन घराबाहेर पडला. त्याला बहिणीने अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो मोटारसायकलवरून वेगाने निघून गेला. त्याच्या मनात काही विपरीत विचार असल्याची भीती वाटल्याने बहीण शेजाऱ्याच्या दुचाकीवरून त्याच्या मागे निघाली.

रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावर तिने पवनला गाठले. मात्र, बहिणीला पाहताच त्याने मोटारसायकल थांबवली आणि तिच्या डोळ्यांसमोरच नदीपात्रात उडी घेतली. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तो वाहून गेला.

भावाने डोळ्यांसमोर नदीत उडी घेतल्याचे पाहून बहिणीने मोठा आक्रोश केला. तिचा आवाज ऐकून पुलावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच पुलावर मोठी गर्दी झाली. नागरिकांनी नदीपात्रात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपत्कालीन यंत्रणेला माहिती देऊन शोधमोहीम सुरू केली. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याचा प्रवाह वेगवान होता. त्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. रेस्क्यू पथकाने इचलकरंजीपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र नदीची खोली आणि पाण्याचा वेग यामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरली. सायंकाळी अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली.

रक्षाबंधनाची राखी मनगटावरच…
रक्षाबंधनाला अवघे दोन दिवस झाले असताना पवनच्या मनगटावर बहिणीने बांधलेली राखी तशीच होती. ज्या भावाला बहिणीने राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेची कामना केली, त्यानेच तिच्या डोळ्यांसमोर नदीत उडी घेतल्याने तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे.पवन विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. घटनेने पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

2 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

16 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

22 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

23 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago