महाराष्ट्र

पुण्यात मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घरातच दार बंद करून चाकूने हल्ला, विश्रांतवाडीत खळबळ

पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर ३० वर्षीय मुलाने घराचे दार आतून बंद करून आईला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर धारदार चाकूने तिच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विश्रांतवाडीतील शांतीनगर झोपडपट्टी परिसरात शनिवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सविता सुरेश हरिभक्त (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा अनिकेत सुरेश हरिभक्त (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

क्षुल्लक कारणावरून वाद, घराचे दार आतून बंद

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी सविता आणि अनिकेत हे दोघेही घरात होते. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले. अनिकेतने घराचे दार आतून बंद करून आईला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

आईच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावले

घरातून सविता यांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकू आल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र, घराचे दार आतून बंद असल्याने त्यांना आत जाता येत नव्हते. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर सविता या गंभीर जखमी अवस्थेत आढळल्या. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देत त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनिकेत हरिभक्त याला ताब्यात घेतले. आरोपी विवाहित असून त्याला दोन लहान मुले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आई-मुलामध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला? अनिकेतने आईवर एवढा टोकाचा हल्ला का केला? हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेचा सखोल तपास सुरू असून आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.या घटनेमुळे कौटुंबिक वादाचे रूप किती टोकाला जाऊ शकते, याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला असून विश्रांतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

6 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

6 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

7 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

7 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

7 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

7 तास ago