महाराष्ट्र

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे. महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण, पर्यटन धोरण, नवे आयटी धोरण, लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण, २०२५ हे सहकार वर्ष म्हणून घोषित करणे आणि अभिजात मराठी भाषा मोहीम दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहीण यासारख्या योजनांची व्याप्ती वाढवण्यात आली असून, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महिला सक्षमीकरणासाठी उमेद मॉल १० जिल्ह्यांत सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने महिलांचे कौशल्यविकास उपक्रम राबवले जाणार आहेत. हे उपक्रम नव्या युगाचे वेध घेणारे ठरणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच “दुर्गम ते सुगम” या कार्यक्रमांतर्गत देवस्थानांचा आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे.

कृषी आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ४५ लाख कृषिपंपांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी ७,९७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजनेसाठी ३६,३०३ कोटी रुपयांची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. शेती उत्पादनांना बाजारभाव मिळावा यासाठीही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने २१ फिरती पथदर्शी न्यायवैधक पथके स्थापन करण्यात येणार आहेत. यासोबतच, हायटेक कमांड सेंटर्सची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे गुन्ह्यांवरील नियंत्रण आणि दोषसिद्धी दर वाढण्यास मदत होईल.

निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने आणि गावोगावच्या गरजा लक्षात घेऊन महिलांना विकासकेंद्री न्याय देण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण केले आहे. या निर्णयांचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

8 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

12 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

12 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

12 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

12 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

13 तास ago