महाराष्ट्र

केंब्रीज ते सेव्हन हिल रस्ता अखेर ६० मीटरच! रस्त्याचे काम नियमानुसारच होणार कोणताही भेदभाव नाही

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेला आता नवी दिशा मिळाली आहे. सिडको चौक ते सेव्हन हिल दरम्यानचा रस्ता ६० मीटर रुंदच राहणार असल्याची ठाम ग्वाही पालकमंत्री संजय शिरसाट आणि महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली आहे. पूर्वी काही ठिकाणी रुंदी ४५ मीटर करण्याचा प्रस्ताव होता, मात्र तो आता रद्द करण्यात आला आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, अतिक्रमण हटवताना परवानाधारकांना नोटीस देऊनच कारवाई होईल.

कोणताही श्रीमंत-गरीब भेदभाव केला जाणार नाही.

जे मार्किंगमध्ये येतील, त्यांचे अतिक्रमण नियमानुसार पाडली जाईल.

रस्त्याच्या मोजणीसाठी नव्याने पाहणी

काही ठिकाणी अलाईनमेंटच्या अडचणी असून, त्यामुळे सेंटर पॉइंट पुढे-मागे झाला आहे. यासाठी नगर रचना विभाग व टिएलआरचे अधिकारी नव्याने मोजणी करतील.

अकराशे कोटींचा निधी आणि गडकरींचे सहकार्य

शहरातील तीन राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणासाठी ₹1100 कोटींचा निधी लागणार असून, तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. यासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) १० दिवसांत तयार केला जाईल.

बाधितांसाठी दिलासा – मिळणार हक्काचं घर

रुंदीकरणात बेघर झालेल्यांसाठी खास योजना आखण्यात आली असून त्यांच्यासाठी….

म्हाडाकडून १०५ घरे महापालिकेकडे घेतली जाणार

अतिक्रमण ग्रस्तांना १० ऑगस्टपर्यंत घरं वाटप करण्याचा संकल्प आहे

अतिक्रमण ग्रस्तांना ११ लाख किंमतीची घर केवळ १ लाखात मिळणार आहे

काही घरं खास भूखंडावर तर काही म्हाडाच्या नवीन प्रकल्पात केले जाणार

म्हाडाच्या नव्या घरांपैकी ५% घरे बाधितांसाठी राखीव ठेवणार.

जटवाडा रोडवरील जागा वापरण्याचे नियोजन

गोल्फ कोर्ससाठी राखीव असलेल्या ७८ हेक्टरमधील काही जमीन बाधितांसाठी वापरण्याचा विचार. यामध्ये २०x३० फुटांचे भूखंड तयार करून अतिक्रमण ग्रस्तांना दिले जातील.

शहरात मोठ्या प्रमाणात विकास घडत असताना रस्त्यांची वाढती रुंदी वाहतुकीसाठी फायदेशीर असली तरी नागरिकांच्या हक्कांचेही संरक्षण तितकेच महत्त्वाचे आहे, हे यामुळे अधोरेखित झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago