महाराष्ट्र

…म्हणून त्या अध्यक्षाच्या तोंडाला फासले काळे

सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट दौऱ्यावर असताना त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. तसेच कारमध्ये आणि रस्त्यावर त्यांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा प्रकार शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा संशय आहे.

गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन चे कार्यकर्ते त्यांच्यावर संतप्त होते. यापूर्वी त्यांनी गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. त्यामुळे आजच्या कृत्याच्या संशयाची सुई देखील शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे जात आहे.

गायकवाड हे संभाजी ब्रिगेड आणि फत्तेसिंह शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे आले होते. या कार्यक्रमात त्यांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आला होता. ते कार्यक्रम स्थळी पोहोचत असतानाच कार्यकर्त्यांचा जमाव त्यांच्या दिशेने आला. त्यांनी गायकवाड यांना घेराव घातला आणि तोंडाला काळे फासले. त्यानंतर गायकवाड हे आपल्या कार मध्ये जाऊन बसले. कारमध्ये घुसून व रस्त्यावर ओढून काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी गायकवाड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

4 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago