महाराष्ट्र

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येणार असून कुटुंबातील भौतिक सुविधांची माहिती ३३ प्रश्नांच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिक मोबाईल किंवा संगणकाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कुटुंबाची माहिती भरू शकतात. एका कुटुंबाने एकच अर्ज भरायचा असून सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नसून फॉर्म पूर्ण झाल्यानंतर ११ अंकी युनिक आयडी दिला जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात, १५ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन ऑनलाइन भरलेल्या माहितीची पडताळणी करतील. ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती प्रगणकांकडून नव्याने नोंदवली जाईल. नागरिकांनी आधीच माहिती भरलेली असल्यास, फक्त युनिक आयडी दाखवून पडताळणी पूर्ण करता येईल.

दरम्यान, नागरिकांनी फक्त अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. डिजिटल प्रक्रियेद्वारे जनगणना अधिक सोपी आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

6 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

6 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

22 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago