मुंबई: नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. यातील सात मृतांची ओळख पटली असून पालकमंत्री दादा भुसे रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत.
यामध्ये जवळपास 45 प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली असून अद्याप तीन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. ते सर्व अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे समजते आहे. शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघाले होते, मात्र वाटेत भीषण संकटाला सामोरे जावे लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले होते त्यानंतर आज स्वतःहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मोबाईलवरुन व्हिडीओ कॉल करुन रुग्णांना धीर देऊन वैद्यकीय सेवेत कोठेही कमी पडू नयेत असे आदेश साहेबांनी हॉस्पिटलला दिलेत. यावेळी नातेवाईकांनी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…