महाराष्ट्र

स्त्री आधार केंद्राच्या पाठपुराव्याला यश, कसे पहा…

पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका कुटुंबियांच्या तक्रारी अर्जानुसार तिच्या १५ वर्षीय मुलीला आरोपी बाळू भैया भोसले, सोनू व राजू भोसले यांनी जादूटोणा करण्यासाठी पाच लाख रुपयाला विकले असल्याचे सांगितले. याबाबत स्त्री आधार केंद्राच्या वतीने तातडीने दखल घेण्यात आली. चाकण पोलिसांच्या मदतीने सदर अल्पवयीन मुलीला येरवडा येथील बाल कल्याण समिती येथे दाखल करण्यात आले आहे. आता लवकरच ही मुलगी आईसोबत तिच्या घरी जाणार असल्याने स्त्री आधार केंद्राच्या चिकाटीने केलेल्या कामाला यश मिळाल्याची भावना या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्या अनिता शिंदे व आश्लेषा खंडागळे यांनी चाकण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वैभव शिनगारे यांच्याशी या केस संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्रातर्फे तिच्या आईला फोन करून याबाबत कल्पना देण्यात आली. दि.१६/०१/२०२२ रोजी तिची आई मुंबईहुन पुण्यात तिला घेऊन जाण्यास आली आहे. त्यानंतर दोघी संस्थेच्या कार्यालयात येणार असल्याचे सांगितले. सदर मुलीसोबत आज बोलणे झाले असता ती सुखरुप असल्याचे सांगितले. तसेच काही दिवसांनी त्या परत गावाकडे येणार असल्याचे सांगितले.

याबाबत स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन सोबत या केसच्या नियमित स्वरूपात पाठपुरावा करण्यात येणार आहे. या कार्यात विधान परिषद उपसभापती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सचिव अपर्णा पाठक यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago