महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे आदेश! बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन

नागपूर: उपराजधानी नागपूरमध्ये बारमध्ये बसून सरकारी काम सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बिअर बारमध्ये बसून महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल क्लिअर करण्याचे काम सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारले. गडचिरोलीमधील चामोर्शी येथील उपअभियंता देवानंद सोनटक्के यांनी बिअर बारमध्ये सरकारी काम करत असल्याचे आणि ठेकेदाराला धरुन बिअर प्राशन केल्याची बातमी सामने दाखवली होती. त्याचा दणका म्हणून काल देवानंद सोनटक्के यांना शासनातर्फे निलंबित करण्यात आले आहे.

नागपूरमधील बिअरबारमध्ये सुरु असलेल्या कारभाराची राज्यभरात चर्चा पाहायला मिळत आहे. बारमध्ये बसून सरकारी अधिकाऱ्याने शासकीय फाईल दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. बारमध्ये दारूचे घोट रिचवत सरकारी काम होत असल्याचे उघड झाले होते. याच प्रकाराचा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला.

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये टेबलावर तिघेजण बसलेले दिसतात. या टेबलावर महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल्स दिसतात. या फाईली पाहताना ते काय काम करत होते, याविषयी चर्चा सुरु झाली. हे अधिकारी गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचे म्हटले जात होते. या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आता यातील देवानंद सोनटक्के या अधिकाऱ्याचे निलंबन झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

19 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago