महाराष्ट्र

जरांगेंच्या टीकेनंतर चित्रा वाघ कडाडल्या! ‘काय उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही’…

मुंबई: मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी भाजपाच्या आमदार व महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दोन दिवसांपुर्वी टीका केली होती.

माझ्या नादाला लागू नको, नाहीत तुझं सगळं गबाळं उचकीन, आमच्या आया-बहीणींवर हल्ला झाला तेव्हा तू कुठे गेली होती’ असा थेट हल्ला जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर चढवला होता. यावर चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या असून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना जशास जसे उत्तर दिले आहे. माझा गबाळं आणि जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, अशा शब्दात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर पलटवार केला. मनोज जरांगे जे बोलले ते मी ऐकलं पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे. मनोज जरांगे गबाळं उचकीन म्हणाले जे उचकायचं ते उचका, मी त्यांना घाबरणारी नाही, माझं नाव चित्रा वाघ आहे, असे, आव्हानच त्यांनी दिले.

मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वापरलेली भाषा भाजप नेत्यांना खटकली. प्रवीण दरेकर, नितेश राणे, चित्रा वाघ व इतर नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत जरांगे यांना सुनावले होते. यापैकी चित्रा वाघ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना टीका केली होती. माझ्या नादाला लागू नको, नाही तर तुझं सगळं गबाळं उचकीन, तुझी सगळी माहिती संध्याकाळापर्यंत माझ्याकडे येईलच, असा दम भरला होता.

यावर माध्यमांनी चित्रा वाघ यांना विचारले असता, ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या आईवर टीका झाली ते महाराष्ट्राला पटणार नाही. आम्हाला तुमच्याबद्दल देखील आदर आहे तुम्ही एका समाजाच्या आरक्षणासाठी मोठं काम करताय. आरक्षण जर कोण देणार तर देवेंद्र फडणवीसच देणार. मनोज जरांगे यांनी त्यांचे शब्द मागे घेतल्याचे म्हटले आहे, तर त्याचे स्वागत आहे. परंतु पुन्हा त्यांच्याकडून अशा भाषेचा वापर होणार नाही, एवढी अपेक्षा आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

मी बाप्पाच्या आगमनाची वाट बघत होते म्हणून थांबले होते. ते जे बोलले ते मी ऐकलं पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे. दुसरे कोणी मुख्यमंत्री असते आणि त्यांच्या आईला कोणी बोलले असते तरी आम्ही सहन केले नसते. मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली, गबाळं उचकीन म्हणाले. जे उचकायचं ते उचका, मात्र मी काही त्यांना घाबरणारी नाही, माझं नाव चित्रा वाघ आहे.

गेली 27 वर्ष मी राजकारणात, समाजकारणात काम करते. आता मी आमदार आहे त्यांना माहीत नसेल, पण मी आमदार असले काय नसले काय जे काम करायचे ते मी करत रहाणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा लढा सुरू ठेवावा, कोणाच्या आया बहिणींना मध्ये आणू नका एवढेच मला सांगायचं आहे. आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून आलोय हे जरांगे ना कुठे माहिती आहे. घाणेरड्या पद्धतीने मला शिवीगाळ केली गेली, जे करायच ते करा मला फरक पडत नाही माझं नाव चित्रा वाघ आहे, माझं काम मी करत राहणार असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली:…

4 तास ago

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…

5 तास ago

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

8 तास ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

10 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

10 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

10 तास ago