मुख्य बातम्या

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला असुन पेट्रोलिंग व तांत्रिक तपासाच्या आधारे एका सराईत मोटारसायकल चोराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या चौकशीत शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कृष्णा उमेश आंतरकर (वय २६, रा. पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

दि ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शिरुर शहरातील बी. जे. कॉर्नर येथील विद्याधाम प्रशालेच्या कंपाउंडजवळ हँडल लॉक करुन उभी केलेली स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एमएच १२ एनजी ७५३९ अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिरुर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी डी.बी. पथकाला चोरीस गेलेल्या दुचाकींसह अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे या चोरीमध्ये कृष्णा आंतरकर याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला.

दरम्यान, संशयित आरोपी शिरुर बाजारपेठ परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार नितेश थोरात यांना मिळाली. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, नितेश थोरात, अंबादास थोरे, दादाराव नागरे व विजय शिंदे यांच्या पथकाने शिरुर बाजारपेठ परिसरात सापळा रचला. यावेळी कृष्णा आंतरकर याला ताब्यात घेण्यात आले

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने बी. जे. कॉर्नर परिसरातील मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलीस कोठडीत अधिक तपास केला असता त्याने शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी पाच ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या चौकशीत शिरुर पोलीस ठाण्यातील एकुण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

विशेष म्हणजे आरोपी कृष्णा आंतरकर याच्याविरुद्ध यापुर्वीही बीड जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमीही समोर आली आहे. आरोपीला शिरुर न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवार दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

हि कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, गणेश देशमाने तसेच नितेश थोरात, अंबादास थोरे, दादाराव नागरे, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील आणि वैभव शेलार यांच्या डी.बी. पथकाने सहभाग घेतला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago