महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र ही परवानगी काही अटी व शर्तींसह देण्यात आली आहे.जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील उपोषणकर्त्यांनी आंदोलनासाठी केलेल्या मागणीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी ही परवानगी दिली.

प्रमुख अटी व शर्ती

स्थळ व वेळ: आंदोलन फक्त आझाद मैदानातील राखीव जागेतच करता येईल. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आंदोलन करण्याची मुभा असेल. ठरलेल्या वेळेनंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.

आंदोलकांची संख्या: जास्तीत जास्त ५,००० आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी आहे. मैदानाचा राखीव भाग साधारण ७,००० चौ. मीटर असून ही जागा ५,००० लोकांना पुरेशी ठरेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक व्यवस्थापन: आंदोलकांची वाहने मुंबईत आल्यानंतर ईस्टर्न फ्रीवे मार्गे वाडीबंदर जंक्शनपर्यंतच येऊ शकतील. त्यानंतर नेत्यांसोबतची केवळ ५ वाहने आझाद मैदानापर्यंत जाऊ शकतील. उर्वरित वाहने शिवडी, ए-शेड आणि कॉटनग्रीन परिसरात पार्क करावी लागतील. गणेशोत्सव काळात वाहतुकीत अडथळा होऊ नये, यासाठी हे नियम घालण्यात आले आहेत.

इतर अटी 

आंदोलनाला फक्त एका दिवसाचीच परवानगी असेल.

शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनास मुभा मिळणार नाही.

परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक वा मोठ्या आवाजाची साधने वापरता येणार नाहीत.

आंदोलनादरम्यान अन्न शिजवणे किंवा कचरा टाकणे कडक मनाई आहे.

लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि वृद्धांना आंदोलनात सहभागी करू नये, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago