औरंगाबाद: छ. संभाजीनगरातील सिडको-हडको भागातील अतिक्रमणे आज म्हणजे २ मार्चपासून काढण्यात येणार असून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागासोबत विद्युत विभागाचे पथकही राहणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्ते, फुटपाथ, ग्रीन बेल्टवरील अतिक्रमणे काढण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात ओपन स्पेस, नागरिकांच्या सोयीसुविधांच्या जागांवरील अतिक्रमणे काढली जातील.
सिडको-हडकोतील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने यापूर्वीच अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने अतिक्रमणे काढण्यासाठी अगोदर सेक्टरनिहाय म्हणजेच सिडको एन-१ ते एन-१३ आणि व्यापारी भागासाठी दोन असे १५ अधिकारी नियुक्त केले. अधिकाऱ्यांनी अतिक्रमणांचे सर्वेक्षण केले.
या प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले. खंडपीठाने महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड लावला. जी-२० परिषद सुरू होण्यापूर्वीच मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी २ मार्चपासून सिडको-हडकोतील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा केली होती. गुरुवारी सकाळपासून प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…