महाराष्ट्र

वायुसेनेत अग्निवीरांची नवीन भरती, १२ वी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज…

औरंगाबाद: वायुसेनेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु भरतीची नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून या संदर्भात उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. यात तरुण आणि तरुणीही अर्ज करु शकतात.

देशभरात अग्निवीरच्या माध्यमातून नौदलात भरतीची प्रक्रिया सुरू आहे, आता वायुदलातही भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. वायुसानेसाठी लेखी परीक्षा २० मे रोजी होणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी agnipathvayu.cdac.in संकेतस्थळावर भेट द्या.

ज्या उमेदवारांनी 12वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह 50% गुण मिळवले आहेत ते अर्ज करू शकतात. किंवा उमेदवाराकडे तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका पदवी असावी. आणि इतर विषयांसाठी, कोणत्याही विषयात 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

✓ पदाचे नाव – अग्निवीर

✓ शैक्षणिक पात्रता – Intermidiate/10+2/ Equivalent (मूळ जाहिरात ✓बघावी.)

✓ वयोमर्यादा – 21 वर्षे

✓ अर्ज पद्धती – ऑनलाईन

✓ अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 मार्च 2023

✓ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2023

✓ अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

वयोमर्यादा

अग्निवीर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराची जन्मतारीख 26 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान असावी.

शारीरीक पात्रता

भरतीसाठी विहित शारीरिक पात्रतेनुसार, पुरुष उमेदवारांची उंची किमान 152.5 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांची उंची 152 सेंटीमीटर असावी. भरती अंतर्गत, उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

11 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

11 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

11 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

15 तास ago