संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा बांधव मोठ्या संख्येने २७ व २८ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी येथून मुंबईकडे जाणार आहे. या रॅलीमध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड व *छत्रपती संभाजीनगर* जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहनांसह सहभागी होणार असल्याने शहागड – तुळजापूर – पैठण – शेवगाव मार्गावरिल सर्व जड वाहनांची वाहतूक २७ ऑगस्ट रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
बदललेले मार्ग
छत्रपती संभाजीनगर ➝ बिडकीन ➝ पैठण ➝ शेवगावकडे जाणारी 🚛 वाहने याऐवजी ➝ छत्रपती संभाजीनगर ➝ वाळुज ➝ गंगापुर ➝ नेवासा ➝ शेवगावकडे जातील
शेवगाव ➝ पैठण ➝ बिडकीन ➝ छत्रपती संभाजीनगर येणारी 🚛 वाहने याऐवजी ➝ शेवगाव ➝ नेवासा ➝ गंगापुर ➝ वाळुज ➝ छत्रपती संभाजीनगरकडे येतील
शहागड ➝ हिरडपुरी ➝ तुळजापूर ➝ नवगाव ➝ पैठणकडे जाणारी 🚛 वाहने याऐवजी ➝ शहागड ➝ डोणगाव ➝ पाचोड ➝ पैठणकडे जातील
पैठण ➝ नवगाव ➝ तुळजापूर ➝ हिरडपुरी ➝ शहागडकडे जाणारी 🚛 वाहने याऐवजी ➝ पैठण ➝ पाचोड ➝ डोणगाव ➝ शहागडकडे जातील. कृपया वाहनधारक व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपला थोडासा सहकार्य वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा ठरेल.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…