महाराष्ट्र

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ‘या’ दिवसापासून मिळणार

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी–मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी बारावीचे प्रवेशपत्र येत्या सोमवारपासून, म्हणजेच १२ तारखेपासून उपलब्ध होणार आहेत.

हॉल तिकीट कुठे आणि कसे मिळणार

सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत

अधिकृत संकेतस्थळ : www.mahahsscboard.in

सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

शाळा / महाविद्यालयांसाठी महत्त्वाच्या सूचना

शाळा व महाविद्यालयांनी प्रवेशपत्राची छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांना द्यावी

प्रवेशपत्र देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये

प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी असणे आवश्यक

हॉल तिकीटवरील फोटोबाबत सूचना

प्रवेशपत्रावरील छायाचित्र स्पष्ट नसल्यास

विद्यार्थ्याचे नवीन छायाचित्र चिकटवावे

त्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी करावी

हॉल तिकीट हरवल्यास काय कराल

हॉल तिकीट गहाळ झाल्यास

शाळा / महाविद्यालयाने पुन्हा छायांकित प्रत द्यावी

त्या प्रतीवर लाल शाईने “द्वितीय प्रत” असा शेरा द्यावा

बारावी परीक्षेचे वेळापत्रक

लेखी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम): १० फेब्रुवारी ते १८ मार्च

प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन

२३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी

एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश

विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेशपत्र मिळवून सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत आणि परीक्षेच्या तयारीला लागवे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

16 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

17 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

17 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

17 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

17 तास ago