शिरूर तालुका

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

पाबळ (सुनिल जिते): मलठण–शिक्रापूर या महत्त्वाच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे हा मार्ग अक्षरशः धोकादायक बनला असून दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

मलठण, शिक्रापूर आणि परिसरातील गावांतील हजारो नागरिकांचा या मार्गावर दररोज वावर असतो. शेतमालाची वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा तसेच रुग्णवाहिकांनाही खराब रस्त्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वाहनांचे नुकसान होत असून प्रवासासाठी दुप्पट वेळ लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही कामाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याची तक्रार केली आहे. पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेले काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून खड्डे बुजवावेत आणि मार्ग सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवरच राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

14 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

18 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

18 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

19 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

19 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

20 तास ago