मनोरंजन

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका ‘कमळी’ मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची आई कायमची गेल्याचा समज असताना ती मोठ्या अपघातातून सुखरूप बचावते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची स्मृती हरवते. तिला कमळीच्या बालपणीच्या आठवणी असतात, पण समोर उभी असलेली स्वतःची लेकही ती ओळखू शकत नाही.

आईच्या या अवस्थेमुळे कमळीवर तिच्या सांभाळाची मोठी जबाबदारी येते. हृषी आणि निंगी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मात्र, कमळीच्या आयुष्यात पुन्हा अडथळे निर्माण करण्यासाठी अनिका नवा डाव आखते. मुलींच्या हॉस्टेलमध्ये बाहेरच्या व्यक्तींना राहण्यास मनाई असल्याचा नियम पुढे करत ती कमळीला हॉस्टेल सोडण्यास भाग पाडते.

मुंबईत दुसरा आधार नसल्याने कमळी, तिची आई आणि निंगी कुठे जाणार, असा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी हृषी पुढाकार घेत तिघींनाही स्वतःच्या घरी घेऊन जातो. मात्र, हे पाहून नयनतारा नाराज होते. त्यावर हृषी स्पष्ट शब्दांत सांगतो की, “जर मी या घरात राहायचं असेल, तर कमळी आणि तिच्या आईलाही काही दिवस या घरात राहू द्यावं लागेल.”

हृषीची ही अट नयनतारा मान्य करणार का? कमळीच्या आईची हरवलेली स्मृती परत येणार का? आणि कमळी पुन्हा एकदा नयनताराचं मन जिंकणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना २३ जुलै, गुरुवारी प्रसारित होणाऱ्या विशेष भागात मिळणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago