महाराष्ट्र

एमएमआरचा सर्वांगीण विकास काही वर्षांत प्रत्यक्षात; परवडणारी घरे आणि आधुनिक वाहतूक सुविधांवर भर; डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई: परवडणारी घरे, दर्जेदार मूलभूत सुविधा आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था या तीन प्रमुख बाबींवर भर देत मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन Dr. Shrikant Shinde यांनी केले.

माजी खासदार Rahul Shewale यांच्या संकल्पनेतून Mumbai Metropolitan Region Development Authority तर्फे मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित ‘एमएमआर@2047’ या परिषदेत ते बोलत होते. परिषदेत लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एमएमआरच्या भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा केली.

राऊंड टेबल चर्चेदरम्यान बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने विविध धोरणांमध्ये आवश्यक बदल करून लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून केवळ घरेच नव्हे, तर दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकारचा भर आहे. म्हाडा, एमएमआरडीए आणि एसआरएसारख्या संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणारे पुनर्विकास प्रकल्प एमएमआरचे चित्र बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, आधुनिक रस्ते, मेट्रोचे विस्तारित जाळे, वॉटर टॅक्सी आणि पॉड टॅक्सी यांसारख्या वाहतूक सुविधांमुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल. मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखाली एमएमआरचा सर्वांगीण कायापालट होईल, असेही त्यांनी सांगितले.

परिषदेचे उद्घाटन नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव Aseem Kumar Gupta यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांनी पायाभूत सुविधा, शहरी नियोजन आणि विकासासंदर्भातील विविध विषयांवर विचारमंथन केले. परिषदेच्या समारोपावेळी पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

धारावी पुनर्विकास देशासाठी दिशादर्शक

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील पुनर्विकासाच्या संकल्पनेला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. केवळ घरे उपलब्ध करून देण्याऐवजी चांगले रस्ते, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि मोकळ्या जागांसह सर्व सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प देशभरातील पुनर्विकास योजनांसाठी आदर्श ठरेल. या प्रकल्पामुळे आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे आधुनिक नगरात रूपांतर होईल, असेही त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

18 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago