महाराष्ट्र

MH-CET परीक्षेतील कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; सचिन सावंत

मुंबई: देशभरात NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, महाराष्ट्रातील MH-CET परीक्षेतही गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी Sachin Sawant यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की, दहावी-बारावीमध्ये अत्यंत कमी गुण मिळवलेल्या अनेक विद्यार्थ्यांना MH-CET मध्ये १०० पर्सेंटाइल किंवा ९९.९ पेक्षा अधिक गुण मिळाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीमध्ये केवळ ३७ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला MH-CET मध्ये ९९.९७१ पर्सेंटाइल मिळाले आहे. तसेच बारावीत ५१ टक्के गुण मिळालेल्या दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, ४५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला १०० पर्सेंटाइल, तर ३९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यालाही १०० पर्सेंटाइल मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

सावंत यांनी सांगितले की, MHT-CET गणित विषयात १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या राज्यातील अव्वल विद्यार्थ्यांच्या HSC गणितातील सरासरी गुण केवळ ६४.३ टक्के होते. टॉप २० रँकर्सपैकी अनेक विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षाही कमी गुण मिळाले होते. एका विद्यार्थ्याला CET गणितात १०० पर्सेंटाइल मिळाले, मात्र HSC PCM मध्ये त्याचे एकूण गुण केवळ ३९ टक्के होते, असा आरोपही त्यांनी केला.

रँक ६६ असलेल्या विद्यार्थ्याचे उदाहरण देताना सावंत म्हणाले की, संबंधित विद्यार्थ्याला दहावीमध्ये गणितात २२ गुण, बारावीत ३३ गुण मिळाले होते. PCM मध्ये त्याचे एकूण गुण ४७.६७ टक्के असूनही त्याला CET मध्ये ९९.९७१ पर्सेंटाइल मिळाले. “हा चमत्कार कसा झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी स्पष्टीकरण द्यावे, तसेच परीक्षेच्या व्यवस्थापनात कोणत्या अधिकाऱ्यांचा संबंध आहे याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

पंतप्रधान Narendra Modi यांच्या “परीक्षा पे चर्चा” उपक्रमाचा उल्लेख करत सावंत यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचारावर टीका केली. व्यापमसारखे घोटाळे आणि विविध राज्यांतील परीक्षा गैरप्रकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे असल्याचे ते म्हणाले.

MH-CET परीक्षा सेलमध्ये गेली ८ ते १० वर्षे तेच अधिकारी कार्यरत असून त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत, असा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

4 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

4 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

8 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

8 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

8 तास ago