मुंबई: भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची ४ व ५ मार्च, २०२५ रोजी दोन दिवसांसाठी भारत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे परीषद आयोजित केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अध्यक्षतेखाली होणारी ही अशी पहिलीच परिषद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त यांनी अगदी प्रथमच या परीषदेकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांना नामनिर्देशीत करण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांना सूचीत केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी हे वैधानिक प्राधिकारी म्हणून राज्य, जिल्हा व मतदार संघाकरीता महत्वाचे अधिकारी आहेत.
या दोन दिवसीय परीषदेतून राज्य तसेच केद्रशासीत प्रदेशांच्या अधिका-यांना विचारमंथन व परस्परांना आलेले अनुभव यातून शिक्षणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या दोन दिवसीय परीषदेच्या पहिल्या दिवशी आधुनिक निवडणूक व्यवस्थापनातील मुख्य क्षेत्रासह आयटी आर्किटेक्चर, प्रभावी संप्रेषण, सोशल मीडियाचा प्रसार वाढवणे आणि मतदान प्रक्रियेतील विविध अधिका-यांची वैधानिक भूमिका यासह प्रमुख मुद्यांवर चर्चा होईल. परीषदेच्या दुस-या दिवशी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी पहिल्या दिवशी झालेल्या मुद्देनिहाय चर्चेच्या अनुषंगाने आपला संबंधित कृती आराखडा सादर करतील, असे भारत निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…