महाराष्ट्र

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कोंडीने उद्योगांना स्थलांतराची भीती; मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोरेगाव भीमा : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर फटका सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना बसत आहे. वाहतूक कोंडीवर वेळीच कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास चाकणप्रमाणे या परिसरातील उद्योगांनाही स्थलांतराचा विचार करावा लागू शकतो, अशी भीती इंडस्ट्रीअल फेडरेशन ऑफ महाराष्ट्रने व्यक्त केली आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. संघटनेचे कैलास नरके यांनी ही माहिती दिली.

पुणे-अहिल्यानगर महामार्गालगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कामगार, अवजड वाहने, कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक होते. मात्र, वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापन अपुरे पडत असल्याने वाहनांना अनेकदा तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागते. याचा थेट परिणाम उद्योगांचे दैनंदिन कामकाज, उत्पादन प्रक्रिया, मालवाहतूक तसेच कामगारांच्या वेळेवर होत आहे.

उद्योगांच्या स्थलांतराची भीती

चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर काही उद्योगांनी स्थलांतराचा विचार सुरू केल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न वेळीच सोडविला नाही, तर येथील उद्योगांवरही स्थलांतराची वेळ येऊ शकते, असा इशारा फेडरेशनने दिला आहे.

महाराष्ट्रात नवीन उद्योग आणि गुंतवणूक आणणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विद्यमान उद्योग टिकविणे आणि रोजगाराचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून उद्योग, रोजगार आणि राज्याच्या आर्थिक विकासाशी संबंधित असल्याचे फेडरेशनने मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

उद्योजकांसोबत तातडीने बैठक घेण्याची मागणी

सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव परिसरातील उद्योजक तसेच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेऊन वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.

चाकणप्रमाणे या परिसरातील उद्योगांनाही स्थलांतराचा विचार करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने वेळीच ठोस पावले उचलून उद्योगांना दिलासा द्यावा, अशी मागणी कैलास नरके यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

11 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

11 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

11 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

11 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

11 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

22 तास ago