महाराष्ट्र

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ११ सदस्यीय निवडणूक समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह विद्यमान व माजी आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारी, मतदारसंघातील समन्वय आणि प्रचाराचे नियोजन करण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे.

समितीतील सदस्य :

CWC सदस्य व माजी मंत्री यशोमती ठाकूर

माजी मंत्री शिवाजीराव मोघे

माजी मंत्री वसंतराव पुरके

आमदार अमित झनक

अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार साजिद खान पठाण

आमदार अनिल मांगुळकर

आमदार धीरज लिंगाडे

माजी आमदार वीरेंद्र जगताप

माजी आमदार राहुल बोंद्रे

माजी महापौर विलास इंगोले

स्वाती वाकेकर

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसने समितीची घोषणा केल्याने पक्षाच्या निवडणूक तयारीला वेग आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

30 मिनिटे ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

44 मिनिटे ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

56 मिनिटे ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

1 तास ago

शिरूर तालुक्यात जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तिघेजण इच्छुक…

शिरुर (तेजस फडके) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) आगामी संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया…

2 तास ago

वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या…

पुणे : वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून एका रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली…

5 तास ago