मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ११ सदस्यीय निवडणूक समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह विद्यमान व माजी आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारी, मतदारसंघातील समन्वय आणि प्रचाराचे नियोजन करण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे.
समितीतील सदस्य :
CWC सदस्य व माजी मंत्री यशोमती ठाकूर
माजी मंत्री शिवाजीराव मोघे
माजी मंत्री वसंतराव पुरके
आमदार अमित झनक
अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार साजिद खान पठाण
आमदार अनिल मांगुळकर
आमदार धीरज लिंगाडे
माजी आमदार वीरेंद्र जगताप
माजी आमदार राहुल बोंद्रे
माजी महापौर विलास इंगोले
स्वाती वाकेकर
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसने समितीची घोषणा केल्याने पक्षाच्या निवडणूक तयारीला वेग आला आहे.