महाराष्ट्र

स्वाभिमान गहाण टाकलेल्या उबाठाला काँग्रेसने जागा दाखवली; शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे

सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीसमोर उबाठा झुकले

मुंबई: इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसणाऱ्या उबाठांनी स्वाभिमान गहाण टाकला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात असताना दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी भाषा करणारे उबाठा दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा करायला गेले होते का, असा खरमरीत सवाल वाघमारे यांनी यावेळी केला.

डॉ. वाघमारे पुढे म्हणाल्या की, उबाठा, आदित्य ठाकरे आणि सकाळचा भोंगा यांना इंडि आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आले होते. यावरुन डॉ. वाघमारे यांनी उबाठावर सडकून टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मणीशंकर अय्यर यांना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारले होते. मात्र आज उबाठा, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत तीन दिवस दिल्लीत काँग्रेसवाल्यांचे बुट चाटायला गेलेत का, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली. नाना पाटेकरांचे सिनेमा पाहण्यापेक्षा बाळासाहेबांची भाषणे ऐकली असती तर आज उबाठावर काँग्रेस नेत्यांसमोर झुकण्याची वेळ आली नसती, असे त्या म्हणाल्या.

सोनिया आणि राहुल गांधींसमोर हिरवा आतंकवाद म्हणण्याचे धाडस उबाठाने का दाखवले नाही. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद, सनातनी आतंकवाद म्हटले तेव्हा निषेध करण्यासाठी उबाठावाले कुठल्या बिळात लपले होते. बाळासाहेबांनी मॅड हिंदू असल्याचे जाहीरपणे सांगितले होते, मात्र ती हिंमत उबाठा दाखवतील का, असा सवाल डॉ. वाघमारे यांनी केला. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या घरी जाऊन तुम्ही ब्रॅंड नाही तर बाळासाहेबांच्या विचारांचा बॅंड वाजवला, अशी खोचक टीका डॉ. वाघमारे यांनी उबाठावर केली. स्वाभिमान गहाण ठेवून राहुल गांधीसमोर झुकणारे उबाठा हे लाचारपुत्र आहेत तर बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे विचारपुत्र आहेत, असे डॉ. वाघमारे म्हणाल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago