महाराष्ट्र

खडसे कुटुंबावर आरोप! खडसेंची सून मैदानात, रक्षा खडसेंनी केलं मोठं वक्तव्य…

पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली होती, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, ते सध्या जेलमध्ये आहोत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे वातावरण आणखी तापलं आहे.

दरम्यान दुसरीकडे भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदारांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात एक पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेमधून खडसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते, खडसे कुटुंबावर सुरू असलेल्या या आरोपांवर आता मंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जळगावात भाजपने एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध केलेल्या आंदोलनावरून तसेच खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपावरून भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या आज जे काही सुरू आहे, त्याच्या वेदना मला सुद्धा होत आहेत, असं रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शेवटी राजकारण आहे, कशा पद्धतीने जातं आहे, हे तुम्ही सुद्धा बघता आहात, जळगाव जिल्ह्यामध्ये हे कुठेतरी थांबले पाहिजे. जळगाव जिल्ह्यामध्ये या गोष्टी सुरू आहेत, त्या कशा पद्धतीने सुरू आहेत, या सर्वांना माहिती आहे. असं सुद्धा यावेळी मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

कुणीही नेता असो त्यांनी विकासावर भर दिला पाहिजे, अशी या जिल्ह्याची आणि मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे. शेतकऱ्यांचे असतील किंवा विकासाचे असतील अनेक मुद्दे आहेत, त्याकडे कुणीही नेता असो त्याने लक्ष दिले तर जिल्ह्याचे चांगले होईल, असं म्हणत रक्षा खडसे यांनी एक प्रकारे भाजपच्या नेत्यांना घरचा आहेर देत नाराजी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

6 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

6 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

7 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

7 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

7 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

7 तास ago