मुख्य बातम्या

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष गंगावणे (वय ३४) या तरुणाचा मृत्यू झाल्याने संपुर्ण शहर हादरले होते. गोळीबार करुन आरोपी पसार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, शिरुर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या ४८ तासांत तीन संशयित आरोपींना शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातुन ताब्यात घेतले.

दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात तौफिक अन्सारी यांच्या घरासमोरील रस्त्यावर हरिष दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन लाख रुपये खिशातून काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन वाद झाला. 

यावेळी रोहित सोनवणे याने पिस्तुलातून गंगावणे यांच्या कानामागील मानेच्या उजव्या बाजूस गोळी झाडल्याने या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गंगावणे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ…

हि घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाल्याने त्यांचा माग काढणे हे शिरुर पोलिसांसमोरचे पहिले आव्हान होते. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकाला तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढला. तपासादरम्यान तीनही आरोपी सुपा (जि.अहिल्यानगर) टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली DB (गुन्हे शोध पथक) पथकाने सुपा टोलनाका परिसर गाठला. पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित हालचालींवर नजर ठेवत योग्य क्षणी शिताफीने रोहित रविंद्र सोनवणे (वय २४, रा. करडे), अनिकेत विलास गव्हाणे (वय २३) आणि आदित्य दादाभाऊ पवार (वय १९), दोघेही रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, या तीनही आरोपीना ताब्यात घेतले. 

पिस्तूल कुठून आले…? तपासाची दिशा महत्त्वाची…

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपींवर यापुर्वी अवैध गावठी पिस्तूल बाळगणे, मारहाण आणि जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाची दिशा केवळ खुनाच्या घटनेपुरती मर्यादित राहणार नाही. गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल नेमके कुठून आले…? शिरुरमध्ये अवैध शस्त्रांचा पुरवठा कोण करतो…? या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का…? आरोपींच्या पुर्वीच्या गुन्हेगारी हालचालींचा या प्रकरणाशी संबंध आहे का…? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

४८ तासांत कारवाई; आता तपासाच्या पुढील टप्प्याकडे लक्ष…

शिरुर शहरातील गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपींना दुसऱ्या जिल्ह्यातुन ताब्यात घेण्यात शिरुर पोलिसांना यश आले असले, तरी या प्रकरणाचा तपास अद्याप महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आरोपींच्या हालचाली, शस्त्राचा स्रोत, घटनेमागील कारण आणि संभाव्य सहकाऱ्यांची भूमिका याबाबत तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

गोळीबारानंतर आरोपींनी शिरुरच्या बाहेर निसटण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या तपासाच्या जाळ्यातून त्यांना सुटका मिळाली नाही. आता आरोपी जेरबंद झाले असले तरी या गोळीबारामागील संपूर्ण साखळी आणि अवैध शस्त्रांचा स्रोत उघडकीस आणण्याचे आव्हान शिरुर पोलिसांसमोर आहे. 

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि शिरुरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, निखील रावडे, अंबादास थोरे, सचिन भोई, राहुल वाघमोडे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांच्या पथकाने हि कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर हे करत आहेत.

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

18 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

21 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

23 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago