मुख्य बातम्या

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या कामगारावर कोयता, दगड, काठी, फायटर तसेच लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि रांजणगाव MIDC पोलिसांनी अवघ्या काही तासांत माग काढत सहा आरोपींना अटक केली असून दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे

दि १८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री 11:30 च्या सुमारास रांजणगाव हद्दीतील वामन वाईन्ससमोर हि घटना घडली होती. आदल्या दिवशी रांजणगाव येथील रुबाब चहाच्या दुकानासमोर झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींच्या टोळक्याने वामन वाईन्समधील कामगार आदित्य तुषार शितोळे याच्यावर हल्ला केला.

आरोपी धनंजय साळुंके, गोरख मोरे, मयुर कांबळे यांच्यासह अन्य सहा ते सात जणांनी एकत्र येत गर्दी जमवली. त्यानंतर आदित्य शितोळे याला हाताने, लाथाबुक्क्यांनी, फायटरने तसेच डोक्यात दगड मारुन मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरु असताना कामगार अशोक उर्फ दादा खेडकर हे मध्ये पडले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावरही कोयता, दगड आणि काठीने हात, पाय व डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.

या हल्ल्यातून खेडकर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आदित्य शितोळे यांच्या फिर्यादीवरुन रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्रीच पोलिसांची धावपळ…

या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी रात्री सुमारे २ वाजता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फिर्यादी व साक्षीदारांकडून घटनेची माहिती घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला. त्यानंतर शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी स्वतंत्रपणे तपास सुरु केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा माग काढला.

स्थानिक गुन्हे शाखेची तीन आरोपींवर कारवाई…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १) सुरज आप्पासाहेब कर्डीले (वय १९), सध्या रा. रामलिंग रोड, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ (रा. जखनगाव, ता. हिंगणगाव, अहिल्यानगर) २) संकेत भागवत कांबळे (वय २०), सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ (रा. शिरुर आनंतपाळ, जि. लातूर) ३) रुपेश विजय मागीरवाड (वय १८ वर्षे, ४ महिने), सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे, मुळ (रा. हिमायतनगर, नांदेड) तसेच दोन विधीसंघर्षीत बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

तर रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ४) मयुर भागवत कांबळे (वय २४), सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ (रा. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर), ५) गोरख विठ्ठल मोरे (वय २३) , सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे. मूळ (रा. मुदखेड, ता. जि. नांदेड), ६) अंकित प्रेमसिंग राठोड (वय २२), सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ (रा. तुळशीनगर, ता. महागाव, जि. यवतमाळ) यांना गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात एकूण नऊ आरोपी आणि दोन विधिसंघर्षित बालकांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यापैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सनी जाधव, धनंजय साळुंखे आणि अमोल सुरवसे यांचा सहभाग असल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

किरकोळ वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात…

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आला. आरोपी अंकित प्रेमसिंग राठोड हा या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने इतर आरोपींच्या मदतीने हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाचे पर्यवसान थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्याने रांजणगाव परिसरात या घटनेची गंभीर चर्चा सुरु आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास…

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार आणि शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे तसेच LCB च्या तपास पथकांतील सहायक फौजदार सजंय पड्याळ, पोलिस हवालदार तुषार पंधारे, जनार्धन शेळके, संजय जाधव, विकास पाटील, राजु मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल सांगर धुमाळ तसेच रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, अविनाश थोरात, भापकर पोलीस उपनिरीक्षक, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, दिपक दळवी, किशोर शिवणकर, केशव कोरडे, आकाश सवाणे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, नितीन भोस, नायकोडे, पांडुरंग साबळे यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन सदर गुन्हयातील आरोपीतांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करीत आहेत. 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

5 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

22 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

1 दिवस ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago