मुंबई: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या आरोपावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून भाजपाने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. “शिवरायांचा अवमान होत असताना तीन दिवस उलटूनही उद्धव ठाकरे गप्प का?” असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
“उद्धव ठाकरेंची दातखीळ बसली आहे का?”
नवनाथ बन म्हणाले, भाजपावर टीका करण्यासाठी सतत पत्रकार परिषद घेणारे आणि सोशल मीडियावर सक्रिय असणारे उद्धव ठाकरे या प्रकरणात मात्र मौन बाळगत आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय राजकीय गणित जुळणार नाही, हे लक्षात आल्यानेच त्यांनी भूमिका घेतली नाही का, असा टोला त्यांनी लगावला.उद्धव ठाकरे यांच्यात स्वाभिमान उरला असेल, तर त्यांनी संबंधित वक्तव्याचा जाहीर निषेध करावा, असे आव्हानही बन यांनी दिले.
टिपू सुलतान वादावरून भाजपाची भूमिका स्पष्ट
टिपू सुलतानच्या संदर्भात भाजपाची भूमिका कायम स्पष्ट राहिली असल्याचे सांगत बन म्हणाले, “जो हिंदूंवर अत्याचार करतो, मंदिरांची तोडफोड करतो, त्याचे समर्थन भाजपा कधीच करणार नाही.”
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईतील मालवणी भागातील एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळी भाजपा नेते मंगल प्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, अतुल भातखळकर आणि तेजिंदर तिवाना यांनी तीव्र आंदोलन केले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.
“शिवरायांचा सन्मान हा अस्मितेचा विषय”
शिवरायांच्या अपमानाचा संबंध निवडणुकांशी जोडणे हा घाणेरडा प्रकार असल्याची टीका करत बन म्हणाले, “भाजपासाठी हा निवडणुकीचा विषय नाही, तर अस्मितेचा विषय आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शिवरायांचा सन्मान राखू.”
“सपकाळांनी महाराष्ट्राची माफी मागावी”
हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
मनी लॉन्ड्रिंगवरून काँग्रेसवर हल्लाबोल
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांवरून काँग्रेसवर निशाणा साधताना बन यांनी केंद्रातील माजी काँग्रेस सरकारवर आरोप केले. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनी पी. चिदंबरम यांना काळा पैसा पांढरा कसा झाला, याबाबत विचारावे, असा टोला लगावला.
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख
पहलगाम हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत, राज्यातील भाजपा महायुती सरकार संवेदनशील असल्याचे बन म्हणाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कुटुंबाला तातडीने नोकरी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा त्यांनी केला.दरम्यान, या सर्व आरोपांवर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…