क्राईम

शिरूर तालुक्यात भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी…

शिरूर (नितीन थोरात) : शिरूर-राजगुरुनगर मार्गावर आज (सोमवार) दुपारी सुमारे चारच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात आमदाबाद हद्दीतील माशेरे मळ्याजवळ घडला असून, या दुर्घटनेत दुचाकीवरील पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवर (MH14 EZ1239) एक पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुले असा पाच जणांचा प्रवास सुरू होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनासोबत (MH12 XX2486) त्यांची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून सर्व प्रवासी गंभीर अवस्थेत आढळून आले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याचमुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शिरूर-राजगुरुनगर मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…

शिरूरमध्ये अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक बसविण्याची नागरीकांची मागणी

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…

शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

7 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago