मुंबई: एचडीएफसी बँकेकडून बोनस शेअर देण्यात येणार असल्याच्या चर्चा होत आहे. यामुळे एचडीएफसीचे शेअर खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर यामुळे शेअर बाजारातही खळबळ उडालीय.
दरम्यान, एका फंड मॅनेजरनं त्याच्या स्मार्ट गुंतणुकीबाबत केलेला खुलासा चर्चेत आलाय. कम्प्लीट सर्कल वेल्थचे सीईओ आणि मॅनेजिंग पार्टनर असणारे गुरमीत चड्ढा गेल्या १५ वर्षांपासून दर महिन्याला एडचीएफसी बँकेचे १० शेअर खरेदी करत आहेत. बाजारात एचडीएफसीचे शेअर कोसळलेले असोत किंवा किंमत वाढलेली असो, त्यांनी फक्त खरेदी करणं कायम ठेवलं. यामुळे त्यांची गुंतवणूक कोट्यवधींवर गेलीय.
गुरमीत चड्ढा यांनी सोशल मीडियावर स्वत:च पोस्ट केली असून त्यात म्हटलं की, १५ वर्षांपासून दर महिन्याला एकदाही खंड पडू न देता १० शेअर खरेदी केले. बाजारात तेजी असो किंवा मंदी, इतर काहीही झालं तरी १० शेअर खरेदी करायचं थांबवलं नाही. इतकंच नाही तर बाजारात मोठी घसरण झाली तेव्हा संधी समजून जास्त शेअर खरेदी केले.
एचडीएफसी बँकेचे २५ हजार शेअर खरेदी करणं हे टार्गेट आहे. पण हे फक्त शेअर्सपुरतं नाहीय. मी १० किंवा २० टक्के रिटर्नकडे लक्ष दिलं नाही तर माझं ध्येय हे १०-२० वर्षात १० ते २० पट परतावा मिळवणं हा आहे. हाच दीर्घ गुंतवणुकीचा खरा खेळ असल्याचंही गुरमीत चड्ढा यांनी म्हटलंय.
चड्ढा यांनी एक जुनी पण नकोशी आठवण शेअर केली. २०२० मध्ये त्यांनी सांगितलं होतं की, २००६ मध्ये एचडीएफसी बँकेत नोकरी करत होतो. त्यावेळी जास्त पगाराची दुसरी संधी मिळाल्यानं नोकरी सोडली. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी असणारा शेअर्सचा पर्याय निवडला नाही.
चार वर्षांनी आपली चूक गुरमीत यांच्या लक्षात आली. त्यांचा जो सहकारी बँकेत काम करत होता त्यानं कर्मचारी शेअर्स पर्यायातून १५ कोटींची कमाई केली होती. यानंतर चड्ढा यांनी दर महिन्याला एचडीएफसीचे १० शेअर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
गुरमीत यांनी एचडीएफसीच्या शेअर्सची किंमत १८० रुपये असताना खरेदी करण्यास सुरुवात केली. आज या बँकेच्या शेअर्सची किंमत २ हजार रुपये इतकी झालीय. दोन स्टॉक स्प्लीट्सनंतर आज त्यांच्याकही जवळपास ६५०० शेअर्स असावेत. या शेअर्सची किंमत आजच्या बाजारभावानुसार १ कोटी ३० लाखांपर्यंत आहे. गुंतवणुकीतून झटपट कमाईच्या लोभापासून वाचलं पाहिजे. दर महिन्याला दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार तुम्हाला कित्येक पटीने फायदा मिळवून देऊ शकतो हेच गुरमीत चड्ढा यांच्याकडून शिकता येईल.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…