महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीच्या दीक्षेवरून वाद; वडिलांचा तीव्र विरोध, कायदेशीर नोटीस

धुळे: धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या दीक्षा सोहळ्यावरून वाद निर्माण झाला असून वडिलांनी संबंधित जैन आचार्यांना कायदेशीर नोटीस पाठवत सोहळा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. ही दीक्षा १४ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जैन धर्मगुरू आचार्य मुक्तिवल्लभसूरी यांच्या आज्ञेनुसार संबंधित मुलीचा दीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुलगी प्राप्ती (जन्म : १३ जून २००८) ही सध्या १८ वर्षांखालील असून कायद्याने अल्पवयीन आहे.

वडिलांचा विरोध

धुळे येथील मनोज सुवालाल कांकरिया यांनी ऍड. राहुल शिकारे यांच्या माध्यमातून जैन समाजातील गच्छाधिपती राजेंद्रसुरीश्वरजी यांना नोटीस पाठवून आपला विरोध नोंदवला आहे. कांकरिया दाम्पत्याचा १३ ऑक्टोबर २०२१ रोजी कौटुंबिक न्यायालयाद्वारे घटस्फोट झाला असून न्यायालयाच्या आदेशानुसार दोन मुलींचा ताबा वडिलांकडे आहे.

कांकरिया यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे की, जैन समाजाच्या परंपरेनुसार वडिलांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय दीक्षा देता येत नाही. मात्र, प्राप्तीच्या दीक्षेला त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला असून त्यांच्या संमतीशिवाय दीक्षा देणे चुकीचे व बेकायदेशीर ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

आईचा आग्रह, आचार्यांचा निर्धार

मुलीची आई दीक्षेसाठी आग्रही असल्याचे समोर आले आहे. संबंधित आचार्यांचे सध्या वास्तव्य रॉयल पॅलेस, गोरेगांव येथे असून, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली भूमिका मांडल्यानंतरही दीक्षा देण्याबाबत ते ठाम असल्याचा दावा वडिलांनी केला आहे.

कायदेशीर प्रश्नचिन्ह

अल्पवयीन मुलीच्या धार्मिक दीक्षेबाबत पालकांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने हे प्रकरण कायदेशीर व सामाजिक दृष्ट्या संवेदनशील बनले आहे. १८ वर्षांखालील व्यक्ती कायद्याने सज्ञान नसल्याने तिच्या संमतीची वैधता, पालकांचा संरक्षक हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, १४ मार्च २०२६ रोजी होणारा दीक्षा सोहळा रद्द करण्याबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

16 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago