मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बदलीच्या दिवशीच त्यांनी ‘पॉवर प्ले’ करत जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. यासोबतच राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेपासूनच तुषार दोषी यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले होते आणि राज्यभर चर्चा रंगली होती. परिस्थिती गंभीर झाल्याने राज्य सरकारला त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे लागले होते.
यानंतर शासनाने त्यांची साताऱ्यातून सांगली येथे बदली केली. मात्र बदलीच्या दिवशीच त्यांनी अधिकाराचा कथित गैरवापर करत काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमांनुसार बदली झालेल्या अधिकाऱ्याला अशा प्रकारचे प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा शिवसेनेने सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच पर्यटन मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडेही निवेदन सादर करण्यात आले आहे.“हा प्रकार अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी केली आहे.
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…