महाराष्ट्र

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अंतर्गत २.५७ मेगावॉट क्षमतेच्या ग्रीड सोलर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ₹१३.०३ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली असून, यामुळे एसटी महामंडळाच्या वीज वापरात मोठी बचत होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, या उपक्रमामुळे एसटीच्या विविध आस्थापनांमध्ये सौरऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी, दरवर्षी सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांचा पारंपरिक वीज खर्च वाचण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान नमुना नकाशे, तांत्रिक मान्यता आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

हा उपक्रम हरित ऊर्जा वापराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही बाबींमध्ये सकारात्मक परिणाम घडवून आणेल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago