मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली असली, तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इराण-अमेरिका चर्चेच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्या आहेत. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार इंधनाचे दर स्थिरच ठेवले आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ₹111.21 प्रति लिटर, तर डिझेलचा दर ₹97.83 प्रति लिटर इतकाच कायम आहे. IOCL, BPCL आणि HPCL या सरकारी तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या 15 दिवसांच्या सरासरी किमतीच्या आधारे दररोज इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात. तरीही गेल्या अनेक महिन्यांपासून किरकोळ दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे आणि अमेरिका-इराण चर्चेच्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, अशी वाहनचालकांची अपेक्षा आहे.
याचवेळी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एअर टर्बाइन फ्युएलवरील करांमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर ₹2.5 वरून ₹3.5 करण्यात आले असून हा निर्णय तात्काळ लागू झाला आहे. तसेच डिझेल निर्यातीवरील एकूण शुल्क वाढवून ₹25.5 प्रति लिटर करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाले असले तरी देशांतर्गत इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे चित्र आहे.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…